रोजच्या आहारात कोणत्या चवीचे पदार्थ किती घ्याल?
आहार सहा रसयुक्त हवा हे तर खरेच पण त्यांचेही काही प्रमाण हवे कारण त्यांचा शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा आहे . जर हे रस योग्य प्रमाणात खाल्ले गेले तर ते उत्तम परिणाम देतात पण प्रमाण बिघडले तर काही दुष्परिणामही करतात . जन्माला आल्यानंतर पहिला पदार्थ जर आपण कोणता खात असू तर एक तर मध किंवा दूध . हे दोन्ही रस चवीला गोड असतात आणि बाळ थोडे मोठे होईपर्यंत त्याला बहुतेकवेळा गोड रसाचेच पदार्थ खाऊ घातले जातात त्यामुळे गोड रस प्रत्येक व्यक्तीचा जन्मापासून परिचित असणारा रस आहे . ह्या रसामुळेच आपल्या शरीराची , वेगवेगळ्या शरीर घटकांची वाढ होते . शक्ति येते . सगळी इंद्रिये चांगल्या पद्धतीने काम करतात . नंतर थोडे वय वाढल्यानंतर जो आहार आपण घेतो त्यातही गहू , तांदूळ , दूध किंवा इतरही पिष्टमय पदार्थ जेजे खातो ते प्रामुख्याने मधुर रसयुक्त असतात , त्यामुळे आपली रोजची होणारी झीज भरून निघते आणि काम करायला उर्जा मिळत राहते . म्हणून आपल्या जेवणात भात आणि पोळी यांचे प्रम