Living with Corona - Warm Water
गरम पाणी कोरोनाची लागण होऊ नये ह्यासाठी काय करावे या अंतर्गत प्रतिबंधात्मक उपायांमध्ये गरम पाणी प्यावे हा एक उपाय भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेला आहे. ही पोस्ट लिहिण्यामागे दोन उद्देश आहेत एक म्हणजे यामागचे शास्त्रीय कारण समजावे आणि दुसरे म्हणजे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात हे कसे करावे याबद्दलच्या आपल्या मनातील शंकांचे निरसन व्हावे. हा उपाय ऐकल्यावर अनेकांना असं वाटलं असेल की ज्या दिवसांत आम्ही फ्रीज मधील थंडगार पाण्याची बाटली डायरेक्ट तोंडाला लावतो त्या दिवसात हे कसले आम्हाला गरम पाणी प्यायला सांगताहेत. पण सध्या कोरोनाची भिती लोकांच्या मनांत इतकी जास्त आहे की त्यांना तुम्ही जे सांगाल ते करतील! मित्रहो आयुर्वेदात गरम पाण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे, प्रत्येक आजारी व्यक्तिने गरम पाणीच प्यायला हवे. पण आयुर्वेदाने देश, काल इ. परिमाणांचा विचार करुन सिध्दांत अंमलात आणायला सांगितले आहे. या उन्हाळ्याच्या दिवसांत जर गरम गरम पाणी प्यायले तर नक्कीच हानीकारक ठरेल! मग हा उपाय चुकीचा आहे का? नक्कीच नाही. कोरोना सारख्या विषाणुजन्य आजारात ( ज्याला आयुर्वेदाच्या भाषेत भूतोपसर्गजन्य ...